फडणवीसांच्या गौप्यस्फोटातील आरोप मविआनं फेटाळलेच, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील थेटच म्हणाले… असं टार्गेट वगैरे

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे प्रकार चांगले माहिती आहे. ज्या प्रकारे ईडी, सीबीआय कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाया करतात. त्यामुळे हे प्रकार त्यांना माहिती आहे.

    जालना : त्यांना काय माहिती मिळाली त्यावरून ते बोलले असतील मात्र महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही, असे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Former Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांना मला टार्गेट (Target) करण्याची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.

    महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale is the candidate of Mahavikas Aghadi for Teachers Constituency) यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक सहविचार सभेच्या निमित्ताने ते जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही. त्यांना काय माहिती मिळाली त्यावरून ते बोलले असतील असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे प्रकार चांगले माहिती आहे. ज्या प्रकारे ईडी, सीबीआय कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाया करतात. त्यामुळे हे प्रकार त्यांना माहिती आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी केली आहे.