
गुरूसेवा परिवार प्रमूख शिवानंद भरले यांच्यासह बारा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांना कारवाईच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. सोमवारी गुरुसेवा परिवार प्रमूख शिवानंद भरले यांनी सीईओ दिलीप स्वामी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य करून आपमानीत भाषणातून केले आहे.
सोलापूर : गुरूसेवा परिवार प्रमूख शिवानंद भरले यांच्यासह बारा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांना कारवाईच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. सोमवारी गुरुसेवा परिवार प्रमूख शिवानंद भरले यांनी सीईओ दिलीप स्वामी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य करून आपमानीत भाषणातून केले आहे. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि विस्तारधिकारी संघटना एकत्रीत येत शिवानंद भरले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या घटनेचा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र असा निषेध नोंदवला आहे. बुधवारपासून काम बंद करण्यास सुरुवात केले आहे. जो पर्यंत शिवानंद भरले यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरुचं ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.
शिवानंद भरले यांनी भाषणातून सीईओ दिलीप स्वामी आणि माझा एकेरीभाषा करत आपत्तीजनक वक्तव्य केले आहे. शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हादपार करण्याची भाषा भरले वापरत आहेत. हे सोलापूर संस्कृतीला शोभनिय नाही. या कृतीचा निषेध करतो
डॉ.किरण लोहार प्राथमिक शिक्षणधिकारी जिल्हा परिषद