बेवारस वाहनांना नोटीस, वाहने चाेवीस तासांत न हलविल्यास जप्ती; गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर निर्णय

वाहतुक काेंडीत भर घालणाऱ्या बेवारस वाहनांवर गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापािलकेने नाेटीस लावण्यास सुरुवात केली आहे. ही वाहने चाेवीस तासांत हलविली नाही तर ती जप्त केली जाणार आहे.

    पुणे : वाहतुक काेंडीत भर घालणाऱ्या बेवारस वाहनांवर गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर महापािलकेने नाेटीस लावण्यास सुरुवात केली आहे. ही वाहने चाेवीस तासांत हलविली नाही तर ती जप्त केली जाणार आहे.

    महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई केली जाते. यापुर्वी अशी वाहने जप्त करण्याची कारवाई केली आहे. सध्या गणेशाेत्सव सुरु आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत असुुन, वाहन उभी करण्यास जागा शाेधण्याची वेळ वाहन चालकांवर येत अाहे. या बेवारस वाहनांमुळे वाहतुक काेंडीतही भर पडत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरही अनेक बेवारस वाहने उभी केली गेली आहेत.

    गणेशाेत्सवात गाैरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढते या पार्श्वभुमीवर महापालिकेने आता बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. अनेक महीन्यांपासून धुळखात पडलेल्या वाहनांवर नोटीस चिटकवून चोवीस तासात ती हलविण्याच आदेश दिले आहे. ही वाहने त्यानंतरही रस्त्यावर उभी दिसल्यास ती जप्त केली जाणार आहेत.

    वाहने काेणाची ? काेणती ? –

    यापुर्वी महापािलकेकडून जप्त केलेल्या बेवारस वाहनांमध्ये पंधरा वर्षाहून अधिक जुन्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे अाढळून आले आहे. ही वाहने कायद्यानुसार पंधरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर पर्यावरण कर भरून त्याची मुदत पाच वर्षाने वाढविता येते. त्याची मुदत वाढविली गेली नसेल तर, वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. हि वाहने स्क्रॅप करत नाही. ती रस्त्यावर बेवारस साेडली जातात किंवा उभी केली जातात. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक काागदपत्रे नसणे हे त्यामागील महत्वाचे कारण आहे.

    पाहणी नंतर कारवाई सुरु होणार

    गुरुवारी महापालिका आणि पोलिस प्रशासनातील अधिकार्‍यांनी गणेश विसर्जन मार्गांची पाहणी केली. या पाहणीमध्ये लक्ष्मी रस्ता (नानापेठ परिसरात), टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता आदी रस्त्यांवर अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने या वाहनांवर चोवीस तासात सदर वाहन हलवण्याची नोटीस चिटकवल्या आहेत.

    ‘‘अशा बेवारस वाहनांची तक्रार करण्यासाठी महापािलकेने टाेल फ्री नंबर जाहीर केला आहे, परंतु त्यावर काेणतीही तक्रार येत नाही. सध्या नाेटीस चिकटविल्या आहेत, जर ही वाहने चाेवीस तासात हलविली नाही तर ती जप्त केली जातील.’’

    - माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका.