भाजपचे आता ‘घर चलाे अभियान’  ; केंद्र सरकारचे काम, याेजनांची माहिती पाेचविणार

पुढील वर्षी हाेणाऱ्या लाेकसभा आणि विधानसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून भाजपने आता ‘घर चलाे अभियान’ हाती घेणार आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारने केलेले काम, याेजनांची माहिती या अभियानातंर्गत प्रत्येक घरापर्यंत पाेचविण्यात येणार आहे. हे अभियान ३० मे ते ३० जुन या कालावधीत राबविले जाणार आहे.

    पुणे :  पुढील वर्षी हाेणाऱ्या लाेकसभा आणि विधानसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून भाजपने आता ‘घर चलाे अभियान’ हाती घेणार आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारने केलेले काम, याेजनांची माहिती या अभियानातंर्गत प्रत्येक घरापर्यंत पाेचविण्यात येणार आहे. हे अभियान ३० मे ते ३० जुन या कालावधीत राबविले जाणार आहे.
    भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार आदी यावेळी उपस्थित होते.
    यावेळी पत्रकार परीषदेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ‘घर चलाे अभियानाची’ माहीती दिली. या बैठकीत गेल्या दहा महीन्यात राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजुर केला गेला. या घर चलाे अभियानात राज्य सरकारच्या निर्णयांची माहीती घराेघरी पाेचविली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या १७६ याेजनांची माहीती राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाेचविली जाणार आहे. या याेजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पाेचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लाेकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सशक्त बुथ अिभयानही राबविले जाणार आहे.
     ४८ जागा मिळविण्याचे उद्दिष्ट
    लाेकसभा निवडणुकीत भाजप-िशवसेना युतीला सर्वच ४८ जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात २०० पेक्षा अधिक जागा मिळतील. निवडणुकीच्या तयारीसाठी ७५ निवडणुक प्रमुख आणि ७०५ मंडळांची पुनर्रचना केली जाणार आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.