
सामान्य विमाधारकांच्या (Policy Holder) खर्चात भर पडली आहे. विमा कंपन्यांच्या (Insurance Company) जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून विशेषतः पुनर्विमा खर्चात अपेक्षित वाढ झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत सामान्य विमा प्रीमियम 15-20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : सामान्य विमाधारकांच्या (Policy Holder) खर्चात भर पडली आहे. विमा कंपन्यांच्या (Insurance Company) जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून विशेषतः पुनर्विमा खर्चात अपेक्षित वाढ झाल्यामुळे येत्या काही महिन्यांत सामान्य विमा प्रीमियम 15-20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय सामान्य विमा बाजार पुढील काळात प्रीमियम्समध्ये आणखी कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील जीआयसीचे अध्यक्ष आणि एमडी देवेश श्रीवास्तव यांनी ग्राहकांना सावध केले आहे. आरोग्य आणि मोटार हे भारतातील दोन प्रमुख विमा विभाग आहेत. 2024 या आर्थिक वर्षात नॉन-लाईफ जनरल इन्शुरन्स विभागाने 1.02 लाख कोटी एवढा प्रीमियम गोळा केला आहे.
तुमच्या विमा कराराच्या हमींचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विमा कंपनीला विमा प्रीमियम भरावा लागतो. या प्रीमियमची रक्कम नेहमीच कव्हरेजच्या स्तरावर अवलंबून असते. ज्याचा तुम्हाला फायदा होत असतो.
पूर्वनिर्धारित जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी विमा कंपनीशी तुमचा करार झाल्यावर तुम्ही दिलेली ही अंतिम रक्कम आहे. त्यामुळे तुम्हाला विमा कंपनीला ठराविक अंतराने (मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक) विमा प्रीमियम भरावा लागतो.