election commission

राज्यसभेच्या सहा जागांसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन मतदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाने केला होता. भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवले आहे.

    मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ जणांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप करत भाजपाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता महाविकास आघाडी सरकारनेही रवी राणा विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यासंदर्भात पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याने या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

     

    राज्यसभेच्या सहा जागांसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीन मतदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाने केला होता. भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवले आहे. व्हिडिओ पाहून पुढील निर्णय होईल. परंतु या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे सांगता येणे कठिण आहे.

    महाविकास आघाडी सरकारने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली. तर रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणे नियमांचे भंग आहे. आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले असून ही मते बाद करावी, अशी मागणी केली आहे.