Navi Mumbai Metro

  Navi Mumbai Metro : दिवाळीच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे. आता नवी मुंबईत मेट्रो धावणार आहे. 17 नोव्हेंबरपासून मेट्रो सुरू होणार असून तळोजा-पेंधरवरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे.  वाचा यावरील सविस्तर रिपोर्ट
  वादात अडकलेली नवी मुंबई मेट्रो अखेर उद्यापासून सुरू
  लोकार्पणच्या वादात अडकलेली नवी मुंबई मेट्रो अखेर उद्यापासून (शुक्रवार) नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. बेलापूर ते पेंधर असा पहिला टप्पा शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
  नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत
  मागच्या १४ वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. आता ही मेट्रो शुक्रवारपासून बेलापूर ते पेंधर अशा मार्गावर धावणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्यापासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बेलापूर ते पेंधर या मार्गाचा लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?
  याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, १७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रोल प्रकल्पातील मार्ग क्रमांक १ म्हणजेच बेलापूर ते पेंधर या दरम्यान मेट्रो सेवा सुरु केली जाणार असून नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न साकार होते आहे. मेट्रोच्या रुपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होणाऱ्या खारघर, तळोजा नॉड यांना मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी लाभणार आहे.
  बेलापूर ते पेंधर मेट्रोचे तिकिट दर कसे असणार?
  बेलापूर ते पेंधरचा हा मार्ग ११ किमींचा आहे. शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून २०२३ पेंधर ते बेलापूर या स्थानकांदरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर दोन्ही बाजूंची पहिली मेट्रो फेरी रात्री १० वाजता असणार आहे. मार्ग क्रमांक १ वर दर पंधरा मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रोचे तिकिटदर हे ० ते २ किमीच्या टप्प्यासाठी १० रुपये २ ते ४ किमी टप्प्या करता १५ रुपये, ४ ते ६ किमींसाठी २० रुपेय ६ ते ८ किमींसाठी २५ रुपये, ८ ते १० किमीसाठी ३० रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी ४० रुपये असे तिकिट दर असणार आहेत.