आता आजारी जनावरेही क्वारंटाईन केली जाणार; लम्पीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

श्री सिद्धेश्वर यात्रा काळामध्ये सोलापुरात जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. सध्या हा बाजार कुठे भरविला जाणार, हे स्पष्ट झाले नाही. तरीदेखील पशूसंवर्धन विभाग सतर्क आहे. लम्पीचा प्रसार होऊ नये म्हणून लक्षणे असलेल्या जनावरांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

    सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रा काळामध्ये सोलापुरात जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. सध्या हा बाजार कुठे भरविला जाणार, हे स्पष्ट झाले नाही. तरीदेखील पशूसंवर्धन विभाग सतर्क आहे. लम्पीचा प्रसार होऊ नये म्हणून लक्षणे असलेल्या जनावरांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जनावरांचा बाजार भरवला जावा, अशी मागणी मंदिर समितीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील लम्पीबाधित (Lumpy Disease) जनावरांची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाणून घेतली.

    याबाबतचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला. सध्या लम्पीबाधित जनावरांची संख्या आटोक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. लम्पीबाधित जनावरांची संख्या आटोक्यात दोन वर्ष कोरोना आणि मागील वर्षी लम्पी आजारामुळे जनावरांचा बाजार भरला नाही. सध्या लम्पीबाधित जनावरांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे.

    जनावरांची तपासणी करणार

    बाजारात येणाऱ्या प्रत्येक जनावरांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे खास पथक त्या ठिकाणी असणार आहेत. तपासणीमध्ये आजारी आढळलेल्या जनावरांना क्वारंटाईन (अलगीकरण) करण्यात येणार आहे.