आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला, मुख्यमंत्र्यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी मध्यरात्री देखील त्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना इतक्या रात्री आपल्यासाठी थांबलात त्यामुळे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रत्येकवेळी त्यांनी आपली भूमिका योग्य होती ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला.

    औरंगाबाद – आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.  त्यावेळी उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आवाज येतोय ना असा प्रश्न विचारत आठ वाजताचा भोंगा बंद झाला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंनी संजय राऊत यांनी नाव न घेता लगावला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी मध्यरात्री देखील त्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधत असताना इतक्या रात्री आपल्यासाठी थांबलात त्यामुळे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रत्येकवेळी त्यांनी आपली भूमिका योग्य होती ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावे लागले. आपली भूमिका योग्य असल्यामुळेच आपल्याला लोकांचे प्रेम मिळत आहे असही ते म्हणाले आहेत. आता जनतेच्या विकासासाठी काम करणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित त्यांना दिले.