Now you will get alert before power outage! Administration appeals to download Damini app

जून व जुलै या दोन महिन्यात वीज पडून जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी ॲप विकसित केले आहे. हे  ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याबाबत सर्वांना प्रवृत्त करावे.

    गोंदिया : पावसाळ्याच्या सुरुवातीला तसेच वादळी पावसात वीज कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही. वीज कोसळण्याच्या १५ मिनिटे आधीच दामिनी ॲप याबाबतची पूर्वसूचना देणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास वेळ मिळेल. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या ॲपचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    जून व जुलै या दोन महिन्यात वीज पडून जीवितहानी होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी ॲप विकसित केले आहे. हे  ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याबाबत सर्वांना प्रवृत्त करावे. गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना  ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच ॲप च्या वापराबाबत मार्गदर्शन करावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करून आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात. कार्यवाहीचा अहवाल देखील आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागविला आहे. दरवर्षी वीज कोसळून बळी गेलेल्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आता ग्रामीण भागात देखील प्रत्येक घरात मोबाइल आहे. त्यामुळे  ॲपचा फायदा होईल.

    असे काम करते दामिनी ॲप

    दामिनी ॲप जीपीएस लोकेशनच्या माध्यमातून काम करते. वीज पडण्याच्या १५ मिनिटे आधीच या ॲपमध्ये स्थिती दर्शविली जाते. आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास सदरच्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. या दरम्यान झाडाच्या खाली आश्रय घेऊ नये. सुरक्षित स्थळी आश्रम घ्यावा आणि इतरांनाही तसे करण्यास सांगावे.