Shocking! Nude video shoot to lure actresses; This is how it was exposed, read in detail

  Three People Arrested For Making Naked Videos As Audition : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात चित्रपटांसाठी ऑडिशन देण्याच्या बहाण्याने महिलांचे नग्न व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरूणी १८ वर्षांची असून अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली आहे. सध्या ती वसईत राहते. सिनेमात काम मिळविण्यासाठी ती विविध निर्मीती कंपन्यांकडे (प्रॉडक्शन हाऊस) भेटी देत होती.

  फसवून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले

  दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. आम्ही नवीन बेवसिरीज तयार करत असून त्यासाठी मुलाखत (ऑडीशन) देण्यासाठी या तरुणीला बोलावले. २ नोव्हेंबर रोजी पीडित तरूणी अर्नाळा येथे गेली. तिथे तिला एक दिग्दर्शनक, एक कॅमेरामन, एक अभिनेता आणि एक महिला मेकअप आर्टीस्ट असे ४ जण भेटले. चौघांनी तिला एका एका लॉज मध्ये ऑडीशनसाठी नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. ही दृ्श्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जात नांही. सिनेसृष्टीत असं कराव लागते असे तिला सांगितले.

  गुन्हेगारांना कशी झाली अटक?
  मात्र यानंतर तिला या कंपनीमधील कुणाचाच कॉल आला नव्हता. दरम्यान, तिची दृश्ये विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारीत केल्या जाणार्‍या वेबसिरीज मध्ये टाकण्यात आल्याची माहिती तिला परिचितांकडून मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखा ३ कडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी तांत्रिक तपास करून अनुजकुमार जैस्वाल (३०), सर्जू कुमार विश्वकर्मा (२५) तसे ३३ वर्षीय महिला आरोपी यांना अटक करण्यात आली.

  पोलिसांनी काय सांगितलं?
  याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, आरोपी हे व्यावसायिक पोर्नोग्राफी करणारे आहे. ते बेकायदेशीरित्या अश्लील व्हिडियो बनवून प्रसारीत करत होते. त्यांनी पीडीत मुलीला बोल्ड बेवसिरिजसाठी ऑडीशन देण्यासाठी पुरूष जोडीदाराला सोबत घेऊन बोलावले होते. पहिल्यांदा त्यांनी साधारण ऑडीशन केले आणि दुसर्‍यावेळी पुन्हा बोलावले. यावेळी पीडीत तरुणी आणि तिच्या मित्राला प्रणय दृश्याचे ऑडीशन करायचे आहे असे सांगून संभोग करण्यास भाग पाडले. हे केवळ ऑडीशनचा भाग आहे असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी ते कोठा नावाच्या ॲपवर तसेच इतर अश्लील संकेतस्थळावर प्रसिध्द केले होते. या अश्लील संकेतस्थळावरून दोनशे ते तीनशे रुपये आकारून या चित्रफिती बघता येत होत्या. त्यातून आरोपींना ४० हजार रुपये मिळाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  पोलिसांनी कोठा ॲप बंद केले असून इतर अश्लील संकेतस्थळांना संपर्क करून त्या चित्रफिती काढण्यास सागितले आहे. मात्र या अश्लील चित्रफिती परदेशातून चालवल्या जात असल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी अडचणी येत आहेत. आरोपींनी अनेक मुलींचे अशाप्रकारे चित्रिकरण केले असून त्या प्रसारीत केल्या आहेत. मात्र अद्याप कुणाची तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.