व्हाट्सअ‍ॅप स्टेट्सला पतीचा फोटो ठेऊन नर्सने संपवलं आयुष्य; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना…

व्हॉट्सऍप स्टेटसला पतीचा फोटो ठेवून नर्सने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. बीडच्या शिरूर कासार येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

    बीड : व्हॉट्सऍप स्टेटसला पतीचा फोटो ठेवून नर्सने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. बीडच्या शिरूर कासार येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलने व्हॉट्सऍप स्टेटसला पती, एक पुरूष आणि 2 महिलांचे फोटो ठेवले आणि त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. 33 वर्षांच्या या नर्सचं नाव शिवकन्या गोरख देवडे असं आहे. ही महिला बीडच्या पिंपळनेर शिरूर कासारमध्ये राहत होती.

    शिवकन्या 2010 पासून शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून काम करत होत्या. त्यांनी राहत्या घरीचं एका पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा सर्व प्रकार घरची खिडकी उघडी असल्यामुळे शेजारच्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

    घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात पाठवला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गळफास घेण्याआधी शिवकन्या यांनी व्हॉट्सऍपवर स्टेटसला पतीसह अन्य 3 जणांचे फोटो ठेवल्याचं समोर आलं आहे.

    शिवकन्या यांचे पती गोरख देवडे ट्रकचालक असल्यामुळे बाहेर होते, तर 11 वर्षांचा मुलगा नातेवाईकांकडे गेला होता, त्यामुळे त्या घरी एकट्याच होत्या. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.