नायलॉन मांजाने दुचाकीस्वार तरुणाची मान कापली, ढोणेवाडा येथील धक्कादायक प्रकार; मांजाची बंदी फक्त नावालाच?

बंदी असणाऱ्या नायलॉन (Naylon) मांजाचा (Manja) वापर अन् विक्री सरास सुरू असल्याचे दिसत आहे. मांजाने एका दुचाकीस्वार तरुणाची मान कापली गेली आहे.

    पुणे : बंदी असणाऱ्या नायलॉन (Naylon) मांजाचा (Manja) वापर अन् विक्री सरास सुरू असल्याचे दिसत आहे. मांजाने एका दुचाकीस्वार तरुणाची मान कापली गेली आहे. त्यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून, ही घटना ढोणेवाडी रस्त्यावर घडली आहे. शहरात यापुर्वी देखील दोन पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे. पोलीस या नायलॉन मांजावर केवळ कारवाईचा फक्त दिखावाच करत असल्याचे दिसत आहे. मध्यवस्थीसह उपनगरांत या मांजाची विक्री आणि नायलॉन मांजाने पंतगबाजी करण्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये सर्वाधिक शाळकरी मुलांचा समावेश आहे.

    श्रीकांत लिपाने (वय २७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत श्रीकांतचा भाऊ निखील लिपाने (वय २७) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे.

    पंतगात अडकलेला मांजा मानेला अडकला

    श्रीकांत जांभुळवाडी रोड भागात राहण्यास आहे. तो नातेवाईकांना भेटण्यासाठी वारजे माळवाडी परिसरात गेला होता. दुपारी साडे चारच्या सुमारास श्रीकांत ढोणेवाडा येथून परत येत होता. त्यावेळी ढोणेवाडा परिसरात पंतगात अडकलेला मांजा त्यांच्या मानेला अडकला. त्यात त्यांचा मानेला जखम झाली. पण, सुदैवाने त्यांच्या हा प्रकार लक्षात त्यांनी सावधान होऊन दुचाकी थांबवली. मात्र, त्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांकडून आता अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    नायलॉन व चायनिज मांजावर बंदी

    शहरातील ४ वर्षांपुर्वी या नायलॉन मांजाने तिघांना जीव गमवावा लागला होता. एका डॉक्टरचा देखील यामध्ये समावेश होता. त्यानंतर मांजाचा प्रश्न गंभीर बनला होता. पुण्यात तेव्हापासून या नायलॉन व चायनिज मांजावर बंदी आणण्यात आली. पण, तरीही शहरात दरवर्षी या मांजाची विक्री होते. संक्रांतीच्या अनेक दिवस आधीच या मांजाची पुण्यात आवक आणि विक्री होते. त्यानंतर पोलिसांना जागा येते आणि पोलीस कारवाईचा फास सुरू करतात. कारवाई होते ती फुटकळ विक्रेत्यांवरच. मोठे मासे यातून सोयीस्कररित्या सुटलेले असतात. त्यानंतर छोट-मोठ्या ठिकाणी हा मांजा सहजरित्या मिळतो. आता शहरातील वेगवेगळ्या मैदनांवर आणि खुल्या जागेवर शाळकरी मुले पंतगबाजी करताना पाहिला मिळत आहेत. त्यांच्या हाती नायलॉन मांजाच दिसतो.

    एका मुलांच्या ग्रुपशी सहच चर्चा केल्यानंतर त्यांनी मांजा पुण्यात सहज मिळतो. फक्त ओळखीच्या व्यक्तींनी जावे लागते. आमचा मित्र देतो अगदीच गंमतीत सांगितले. याठिकाणी जवळपास सहा ते सात पंतग उडविले जात होते. त्यात सर्व पंतगांना नायलॉनचाच मांजा दिसून आला. इतकच नाही तर, पंतग तुटल्यानंतर ही मुल त्याच्या मागे-मागे धावून तो पतंग मिळवतात. पण, ते पंतागासाठी नाही तर त्याला असणाऱ्या मांजासाठी धावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांकडून ठोस कारवाई व उडविणाऱ्या या मुलांच्या पालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत त्याच परिसरातील एका व्यक्तीने सांगितले.