“अरे बापरे काही तरी झ्यांगाट झालेले दिसतंय…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात चर्चा; असं काय आहे ट्विटमध्ये? एकदा वाचाच…

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, त्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्याचा फोटो शेअर केला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वासाठी एकत्र आलं पाहिजे, मला जरा तसे आदेश आले तर, मी या दोघांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन.” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

    ठाणे- राज्यात सत्तांतर होऊन आता 9-10 ते महिने होताहेत. शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा सुपूर्द केला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. दरम्यान, या कालावधीत राज्यातील सत्तासंघर्ष, पक्ष चिन्ह, पक्षाने नाव आदीवरुन मविआ व भाजपा-शिंदे गट आमनेसामने आले आहेत. दरम्यान, ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी एका यांनी महिलेचा विनयभंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी ठाण्यात राजकीय वातावरण तापलं होतं. शिंदे गट व ठाकरे गटाने एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण कोणत्याही नेत्यानं असं वक्तव्य केलेलं नव्हतं. मात्र आता हिंदुत्वासाठी शिंदे गट व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, असं भाजपाचे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबतचे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

    काय म्हटलंय ट्विटमध्ये?

    जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, त्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्याचा फोटो शेअर केला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वासाठी एकत्र आलं पाहिजे, मला जरा तसे आदेश आले तर, मी या दोघांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन.” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे, हे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केलं आहे. तसेच “अरे बापरे काही तरी झ्यांगाट झालेले दिसते आहे दादा वडिलधाऱ्या सारखे बोलत आहे … दादा वाचवा …” असं ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

    शिंदे-ठाकरे एकत्र येणार?

    दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर चर्चा सुरु आहे. तसेच ठाकरे गटातील तसेच शिंदे गटातील कार्यकर्त्यांची देखील भावना आहे की, या दोघांनी हिंदुत्वासाठी एकत्र यावे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे व शिंदेंना एकत्र आणण्यासाठी भाजपा तसेच चंद्रकांतदादा पाटील पुढाकार घेणार का? पुन्हा एकदा ठाकरे-शिंदे एकत्र येणार का? यावर चर्चा सुरु आहे.