विधान परिषदेच्या दहा नवनिर्वाचित सदस्यांचा उद्या शपथविधी

विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या विधान परिषदेच्या १० सन्माननीय सदस्यांच्या शपथविधी/प्रतिज्ञाग्रहणाच्या (Oath Taking Ceremony)  समारंभाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे.

    मुंबई : महाराष्‍ट्र विधान परिषदेवर (Maharashtra Legislative Council) विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या १० सन्माननीय सदस्यांच्या शपथविधी/प्रतिज्ञाग्रहणाच्या (Oath Taking Ceremony)  समारंभाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. महाराष्‍ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने (Nilesh Madane) यांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जुलै २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता हा शपथविधी होणार आहे. राज्याच्या विधान परिषदेच्या उप सभापतींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    प्रविण दरेकर (Pravin Darekar), प्रा. राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya), रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), एकनाथ खडसे (Eknath Khadse), सचिन अहिर (Sachin Ahir) ,आमश्या पाडवी (Amshya Padvi), अशोक ऊर्फ भाई जगताप (Ashok Jagtap) हे १० सन्माननीय सदस्य मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.