The assistant police inspector was caught red-handed taking a bribe in the ACB's net

भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.

    वरवंड : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.

    यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीष सोनवणे आदी उपस्थित होते. यावर्षी दक्षता जनजागृती सप्ताह, ‘भ्रष्टाचार मुक्त भारत-विकसित भारत’ या संकल्पनेसह साजरा करण्यात येत आहे. कोणताही  राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याची  नागरिकांना माहिती होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

    -भ्रष्टाचाराबाबत येथे करा तक्रार
    भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, तसेच पुणे कार्यालय येथील दूरध्वनी क्र ०२०-२६१३२८०२,२६१२२१३४तसेच www.acbmaharashtra.gov.in   या संकेतस्थळावर, तसेच ईमेल dyspacbpune@mahapolice.gov.in, मोबाईल ॲप www.acbmaharashtra.net.in किंवा ७८७५३३३३३३ या क्रमांकावर व्हॉट्सॲप क्रमांकावर  तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.