ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांचा इशारा; म्हणाले, ‘आमच्या आरक्षणाला कोणीही…’

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी हे आंदोलन छेडले असून त्यांच्या नेतृत्वामध्ये 'जनजागर रथ यात्रा' निघणार आहे. ओबीसी समाजासाठीच्या मागण्यांसाठी ही रथयात्रा निघणार आहे.

    नागपूर : मराठा समाजाला (Maratha) कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) असल्यास ओबीसीमधून (OBC) सगेसोयऱ्यांसह आरक्षण (reservation) देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. यानंतर आता ओबीसी समजाने देखील आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांनी हे आंदोलन छेडले असून त्यांच्या नेतृत्वामध्ये ‘जनजागर रथ यात्रा’ (Janjagar Rath Yatra) निघणार आहे. ओबीसी समाजासाठीच्या मागण्यांसाठी ही रथयात्रा निघणार आहे.

    नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथ यात्रेला सुरुवात होत आहे. राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्याआधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे. देशभरात 60 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंज्या आरक्षण असल्याने जातनिहाय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं, अशा प्रमुख मागण्यांसाठी या ओबीसी जनजागर रथ यात्रेला सुरुवात झाली आहे.

    संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही जनजागर रथयात्रा फिरणार आहे. यामधून ओबीसी समाजाचे प्रबोधन करण्याचे आणि लोकांना जागृत करण्याचे महत्त्वाचे काम करेल असे आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला कामठी येथे ओबीसी समाजाची महासभा देखील होणार आहे. या सभेनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे.