sharad pawar talking

सुप्रीम कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढवणार की वेगवेगळ्या यांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रपरिषदेत याबाबत मोठे विधान केले आहे(OBC state reservation canceled; Sharad Pawar's clear statement on the issue of contesting elections).

  कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढवणार की वेगवेगळ्या यांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रपरिषदेत याबाबत मोठे विधान केले आहे(OBC state reservation canceled; Sharad Pawar’s clear statement on the issue of contesting elections).

  माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की, प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यावर एकत्र बसावे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, आपण सरकार एकत्र चालवतो. जर एकत्र निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीकोनातून चांगले राहील. पण याबाबत आमचा निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. एकमेकांची मते जाणून घेतल्यानंतर जाहीरपणे बोललेले बरे, असे पवार यांनी सांगितले.

  यावेळी शरद पवारांना राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि त्याला भाजपा खासदाराकडून होणाऱ्या विरोधासंबंधी विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातूही काल अयोध्येत होता. दरम्यान राज्यात सध्या भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, कोणाचे आर्थिक नुकसान होत नाही, पण भावनांचा प्रश्न आहे.

  शिर्डीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी प्रार्थना होते. या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्रे असतात. अनेक काळापासून सुरु असलेल्या पद्धती सुरू राहाव्यात, असे त्यांना वाटत असते. एखाद्या गोष्टीमुळे त्या बंद झाल्या तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागले आहेत, असे ते म्हणाले.

  आतापर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी चळवळी व्हायच्या. हनुमान चालिसा वैगेरे गोष्टी होत नव्हत्या. सामान्य लोकांचे प्रश्न महागाई, बेकारी, कायदा-सुव्यवस्था आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला राहिले आणि अयोध्येचे काय झाले, प्रार्थना म्हणा सुरू आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आले असल्याने लोकांचे लक्ष वळण्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे, असे सांगत शरद पवारांनी मोदी सरकावर निशाणा साधला.

  केंद्र सरकारविरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरू आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरू आहे. आमच्या देखील बैठका सुरू आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केल्या पाहिजेत, असेही पवार यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांना पक्ष काढू द्या, निवडणुका लढू द्या. म्हणजे समजेल निवडणुका काय असतात ते, असेही ते म्हणाले.