वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांवर गुन्हा; पिडीत महिलेची केली सुटका

महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथवडे येथील साईलॉजवर शनिवारी (दि. 23) कारवाई करत पोलिसांनी पिडीत महिलेची सुटका केली.

    पिंपरी : महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथवडे येथील साईलॉजवर शनिवारी (दि. 23) कारवाई करत पोलिसांनी पिडीत महिलेची सुटका केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार ललिता भरसट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम व फईम ऊर्फ एम. डी. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून पिडीत महिलेला पैशांचे आमिष दाखविले. त्या महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या रक्कमेतून आरोपींनी स्वतःची उपजीविका भागवली. वाकड पोलीस तपास करत आहेत.