जुलूसमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवले; परतवाडा येथे तणाव

परतवाडा शहरात रविवारी दुपारी महावीर चौक पेन्शनपुरा परिसरात ईदनिमित्त निघालेल्या जुलूसमध्ये 'सर तन से जुदा' अशा आशयाचे गाणे वाजले. हे गाणे वाजताच जुलूसमधील सहभागी तरुणांचा उत्साह द्विगुणीत झाला आणि त्यांच्या हावभावामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही काळ तणाव पसरला होता.

    अमरावती : ईद (Eid-E-Milad) निमित्त रविवारी परतवाडा (Paratwada) शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजल्यामुळे (Offensive Song Played) तणाव (Stress) निर्माण झाला. यासंदर्भात पोलिसांनी सोमवारी रात्री आठ ते दहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

    परतवाडा शहरात रविवारी दुपारी महावीर चौक पेन्शनपुरा परिसरात ईदनिमित्त निघालेल्या जुलूसमध्ये ‘सर तन से जुदा’ अशा आशयाचे गाणे वाजले. हे गाणे वाजताच जुलूसमधील (Julus) सहभागी तरुणांचा उत्साह द्विगुणीत झाला आणि त्यांच्या हावभावामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही काळ तणाव पसरला होता. या गंभीर प्रकरणासंदर्भात भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही आणि व्हिडिओवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

    परतवाडा येथे ईदनिमित्त निघालेल्या ज्युसमध्ये जे काही गाणे वाजले ते धार्मिक तणाव निर्माण करणारे होते. हे गाणे वाजत असतानाच जुलूसमध्ये सहभागी तरुणांकडून देखील सर तन से जुदा असे नारे देण्यात आले. ईदनिमित्त जुलूस काढणे गैर नव्हे; मात्र दुसऱ्याचा जीव घेण्याबाबत घोषणाबाजी करणे चुकीचे आहे. हा संपूर्ण प्रकार पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी मानसिकता मुस्लीम समाजात पसरविली जात आहे. या लोकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे.