पुणे विद्यापीठाच्या वसतीसगृहात पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील मुलांचे वसतीगृह (वसतीगृह क्रमांक ८) येथे कपडे धुण्याच्या जागेजवळ भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचे गुरुवारी (२ नोव्हेंबर) उघडकीस आले. या घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या आवारात उमटले.

    पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषेत मजकूर लिहिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. त्यानंतर याप्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारातील सीसीटीव्ही तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.