My dream is to run a flying bus in Nagpur - Union Minister Nitin Gadkari

विद्यार्थी जीवनात काम करत असताना दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार (Shrikant jichkar) यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. (Congress offer to me nitin gadkari) या ऑफरवर नितीन गडकरी यांनी त्यावेळी दिलेलं उत्तर त्यांनी नागपुरातील (Nagpur) कार्यक्रमात बोलताना सांगितलं. गडकरी म्हणाले की, मी जिचकार यांना उत्तर दिलं, की 'मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.

    नागपूर : सध्या देशात काँग्रेसची वाताहात झालेली आहे, काँग्रेसला (Congress) सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळं पक्षाला गळती लागली आहे. दरम्यान, आपणाला सुद्धा आपल्या एका जवळच्या मित्राने काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतंच नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. विद्यार्थी जीवनात काम करत असताना दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार (Shrikant jichkar) यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. (Congress offer to me nitin gadkari) या ऑफरवर नितीन गडकरी यांनी त्यावेळी दिलेलं उत्तर त्यांनी नागपुरातील (Nagpur) कार्यक्रमात बोलताना सांगितलं. गडकरी म्हणाले की, मी जिचकार यांना उत्तर दिलं, की ‘मी विहिरीत उडी घेईल पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही, असं गडकरींनी सांगितले.

    दरम्यान, पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना आजकाल राजकारण (Politics) समाजकल्याणासाठी (Social) राहिलं नसून सत्तेसाठी असल्याचंही म्हटलं आहे. तसेच जनतेची कामं केली तर तुम्हाला मतं मागण्याची पण गरज पडणार नाही, राजकारणाचा व सत्तेचा वापर लोकांच्या कामासाठी समाजासाठी केला पाहिजे, असं गडकरींनी म्हटलं.