शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केले आरटीओ नियमांचे उल्लंघन, सत्ता आहे तर काहीही करणार का?

आता आरटीओ नियमांची उल्लंघन करणाऱ्या या गाडी चालकाच्या विरोधात कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    कल्याण-अमजद खान : सत्तेमध्ये असलेल्या एका पक्षातील पदाधिकाऱ्याचे धाडस बघण्यासारखेच आहे. त्याने त्याच्या चार चाकीवर नंबर प्लेटच्या जागी त्याचे आडनाव लिहिले आहे. नकुल गायकर असे त्याचे नाव असून त्याने त्यांच्या चार चाकी गाडीच्या मागे आणि पुढे नंबर प्लेटऐवजी गायकर असे नाव लिहीले आहे. नकुल पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहे. आता आरटीओ नियमांची उल्लंघन करणाऱ्या या गाडी चालकाच्या विरोधात कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    कल्याण डोंबिवली शहर हे नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. इथली महापालिका असो, अधिकारी असो इथले नेते असोत. काही दिवसांपूर्वी दोन लोकप्रतिनिधींचा वाद विकोपाला गेला. याच वादातून एका लाेकप्रतिनिधीने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केला. या आधी देखील महापालिकेची महासभा सुरु असताना नगरसेवक महासभेत आपसात भिडल्याच्या घटना घडल्या होत्या. कल्याण डोंबिवली अनेक माजी नगरसेवक आहेत.

    जे पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांच्यासाठी पोलीस संरक्षण पुरेसे नाही. त्यांना खाजगी बॉडीगार्ड आणि फंटरची फौज घेऊन फिरतात. त्यांच्या मागे दोन ते तीन गाड्यांचा ताफा असतो. ते पोलीस सायरनचा देेखील बेकायदेशीरपणे वापर करतात. आता तर थेट शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने गाडीवर नंबर प्लेटऐवजी गायकर असे नाव लिहीले आहे. सत्ता आहे तर कायपण चालते का. पोलीस ट्रॅफिक पोलीस जे सर्व सामान्यांवर कारवाई करते. या गाडी चालकाच्या विरोधात कारवाई करणार का? आतापर्यत कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.