सावकाराच्या जाचाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटनेने खळबळ

पुण्यातील मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या एका लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

    पुणे : पुण्यातील मंगळवार पेठेतील बालाजी हाईट्स इमारतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागाच्या एका लेखाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश शंकर शिंदे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

    गणेश शिंदे यांना मुंबईतून पुण्याला बदली हवी होती. या बदलीसाठी त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली होती. यासाठी शिंदे यांनी सावकाराकडून ३० टक्के व्याजाने ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी सावकाराने गणेश शिंदे यांचा आर्थिक आणि मानसिक छळ सुरु केला होता. अखेर या सावकाराच्या जाचाला कंटाळून शिंदे यांनी आत्महत्या केली आहे.

    -आरोपींना अटक

    याप्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी आणि त्यांचे वडील, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा, पंधरकर यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विजय सोनी, बाळकृष्ण सोनी, गणेश साळुंके आणि मनीष हजार यांना पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईट नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे.