well-known builder ED in Mumbai; Raid on omkar group

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या ओंकार रिअल्टर्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा यांना वैद्यकीय उपचारांसाठी लीलावती या खासगी रुग्णालयात राहण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) वर्मांना जे.जे या सरकारी रुग्णालयात हलविण्याचे निर्देश दिले(Omkar Builder's MD Babulal Verma, who is in jail, was slapped by the court).

  मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या ओंकार रिअल्टर्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा यांना वैद्यकीय उपचारांसाठी लीलावती या खासगी रुग्णालयात राहण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) वर्मांना जे.जे या सरकारी रुग्णालयात
  हलविण्याचे निर्देश दिले(Omkar Builder’s MD Babulal Verma, who is in jail, was slapped by the court).

  ईडीने ओंकार रिअल्टर्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा यांना २२ हजार कोटींच्या झोपु (झोपडपट्टी पुनर्वसन) प्रकल्पात फसवणूक केल्याच्या आऱोपाखाली अटक केली असून या प्रकल्पासाठी येस बॅंकेकडून ४५० कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकाकडून हजारो कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोपही ओमकार ग्रुपवर आहे.

  बाबुलाल वर्मांना जामीन २३ मार्च रोजी वैद्यकीय कारणास्तव देण्यात आला होता. त्याच्यांवर लीलावती या खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. सदर जामीनाला वाढ देण्यात यावी, अशी मागणी कऱणारा त्यांचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावताना त्यांचा जामीन रद्द केला आणि त्यांना पुन्हा आर्थर रोड कारागृहात जाण्याचे तसेच जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वर्मांनी उच्च न्यायालयात धाव घेत तात्पुरत्या किंवा सहा महिन्यांसाठी जामीन वाढवण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठताना वर्मांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या वैदयकीय तज्ज्ञ समिती स्थापन कऱण्याचे निर्देश दिले.

  तसेच जे.जे रुग्णालयात अशा सुविधा उपलब्ध आहेत की नाही आणि वर्मांना तेथे हलवणे योग्य आहे का, आवश्यक उपचारांचे स्वरूप यांचा समावेश असलेला अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने समितीला दिले होते. ९ मे रोजी न्यायालयाच्या निर्देशानुसार, जे.जे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या तज्ज्ञ समितीने, वर्मा दाखल असलेल्या लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भेट दिली.

  वर्मांच्या जामीन अर्जावर नुकतीच न्या. एन. जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जेजे रुग्णालयातील समितीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. त्यानुसार, वर्मांच्या शरीरातील गरजेसाठी ऑक्सिजनचे मूल्यांकन करणे आवश्यक असून त्यांना डिस्चार्ज देता येत नसले तरीही त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा जे.जे रुग्णालयात असल्याचे समितीने अहवालात नमूद केले होते.

  त्याची दखल घेत न्यायालयाने वर्मांचा तात्पुरता जामीन २० मे पर्यंत वाढविला आणि त्यांना लीलावतीतून जेजे रुग्णालयात दाखल कऱण्याचे तसेच त्याच दिवशी वर्मांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.