…तर आम्ही तुम्हाला चित्ता सरकार म्हणू, पेंग्विन सरकार व चित्ता सरकारवरून भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये कलगीतुरा

मोदींनी भारतात आणलेले चित्ते यावरुन विरोधीपक्षांनी टिका केली असताना, आता भाजप व शिवसेना (BJP and Shivsena) नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, पाच नर व तीन मादी चित्ता भारतात शनिवारी दाखल झाले. मोदींनी आपल्या वाढदिवशी या मध्य प्रदेशमधील कोनु या राष्ट्रीय उद्यानात या चित्तांना सोडले. यावरुन शिवेसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) अनेक वर्षानंतर भारतात नामिबियावरुन चित्ता (Cheetah) आणण्यात आले. यावरुन आता राजकीय वर्तुळात कलगीतुरा सुरु आहे, मोदींनी भारतात आणलेले चित्ते यावरुन विरोधीपक्षांनी टिका केली असताना, आता भाजप व शिवसेना (BJP and Shivsena) नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, पाच नर व तीन मादी चित्ता भारतात शनिवारी दाखल झाले. मोदींनी आपल्या वाढदिवशी या मध्य प्रदेशमधील कोनु या राष्ट्रीय उद्यानात या चित्तांना सोडले. यावरुन शिवेसेनेनं भाजपाचा समाचार घेतला आहे.

    दरम्यान, आम्ही जेव्हा मुंबईत पेंग्विन (Penguin) आणले तेव्हा आम्हाला हे पेंग्विन सरकार म्हणाले होते. मग यांना आता आपण चित्ता सरकार म्हणायचे का? असा सवाल  शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. तर आम्हाला जर कमळाबाई म्हटला तर आम्ही तुम्हाला पेंग्विनसेना म्हणू असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी दिला आहे. दुसरीकडे युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी (Varun sardesai) हे जर आम्हाला पेंग्विनसेना म्हणत असतील तर आपण सर्वांनी भाजपाला भाजपा चित्ता किंवा चित्ता सरकार म्हणायचे असं वरुण सरदेसाईंनी शिवसैनिकांना आवाहन केल. त्यामुळं आता प्राण्यावरुन सुद्धा भाजपामध्ये राजकारण तसेच कलगीतुरा रंगत आहे, त्यामुळं आगामी काळात आणखी कोणकोणत्या कारणावरुन या दोन पक्षात राजकारण होईल याचा काही नेम नाही.