एक ऑक्टोबर रोजी सोलापूर  जिल्हा करणार एक तास स्वच्छता श्रमदान : सीईओ मनिषा आव्हाळे

'स्वच्छता ही सेवा' मोहीम अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये 'एक तारीख एक तास' या मोहिमेखाली स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे,  अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

    सोलापूर : ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम अंतर्गत दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी तालुक्यातील सर्व गावांमध्ये ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेखाली स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे,  अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

    स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वा. या वेळेत जिल्हातील प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावात एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविणेत येणार आहे.

    ज्या जागेवर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबवावयाची आहे. त्या जागेची निश्चिती आधीच्या दिवशीच संबंधित ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांना सुचना दिले आहेत. गावानजीक असलेले रेल्वे ट्रॅक आणि स्थानके आणि आजूबाजूचा परिसर, रस्त्याच्या कडेला (NH,SH, लोकल), पाणवठे, घाट, झोपडपट्ट्या, पुलांखालील, बाजाराची ठिकाणे, बॅकलेन्स, प्रार्थनास्थळे, सार्वजनिक आणि खाजगी कार्यालयांच्या आजूबाजूचे क्षेत्र, पर्यटकांची ठिकाणे, बस स्टँड आणि टोल प्लाझा, प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र, गोशाळा, टेकड्या, समुद्रकिनारे, बंदर क्षेत्र, निवासी क्षेत्रे, आरोग्य संस्था आणि लगतचे क्षेत्र, अंगणवाड्यांभोवतीचे क्षेत्र, शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासचे क्षेत्राचे परिसरात ही स्वच्छता मोहिम घेणेत येत आहे.

    स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सरपंच, ग्रामसेवक. ग्राम विकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, युवक युवती मंडळे, शालेय विद्यार्थी, ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित राहण्यासंदर्भात तालुका स्तरावरून लेखी स्वरूपात कळविण्यात येत आहे. जिल्ह्सात १५ सप्टेबर पासून. व्यापक स्वरूपात स्वच्छतेचे कार्यक्रम घेणेत आले आहे. या सर्व कार्यक्रमाची नोंद केंद्र शासनाचे संकेतस्थळावर करणेत येत आहे. या सर्व कार्सक्रमाच् फोटो सहभागी संख्या नोंद करणेत येत आहे. सर्वानी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.

    एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमे दरम्यान प्रारंभी गावफेरीचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्यास संदर्भात आवाहन करण्यात यावे. स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतील याबाबत नियोजन करण्या बाबत सुचना देणेत आले असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.