जत वादावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमावाद सामोपचाराने सोडवण्यावर भर

जत वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही मागणी २०१२ मधली होती. त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती, पण आता बऱ्याचशा योजना केल्या आहेत. अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय, पाण्यावाचून राज्यातील कोणतेही गाव तिथे जाणार नाही, एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे.

    मुंबई – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadanvis Government) गंभीर आरोप केला आहे. राज्यातील सरकार तातडीने घालवले नाही तर केंद्र सरकार राज्याचे पाच तुकडे करेल, असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

    जत वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही मागणी २०१२ मधली होती. त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती, पण आता बऱ्याचशा योजना केल्या आहेत. अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय, पाण्यावाचून राज्यातील कोणतेही गाव तिथे जाणार नाही, एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या युद्धपातळीवर सोडवल्या जातील, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

    सीमावाद हा विषय सामोपचाराने सोडवण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक झालेली आहे, केंद्र सरकारही सकारात्मक भूमिका घेईल, हा विषय सामोपचाराने सोडवला जाईल अशी आमची भूमिका आहे. अनेक योजना आणि लाभ मिळत होते, त्यात सुधारणा केली. यात आणखी वाद निर्माण करु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.