On the first day, 81 employees were transferred in Zilla Parishad

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नियंत्रित कनिष्ठ अभियंता पदाची बदली प्रक्रिया झाली. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ६७, बांधकाम विभागातील ३, ग्रामीण पाणी पुरवठा १ व पशुसंवर्धन विभागातील १० अशा ८१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी झाल्या.

    अमरावती : जिल्हा परिषदेत मंगळवारपासून बदली प्रक्रियेला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी बांधकाम, सामान्य प्रशासन विभाग, पशू संवर्धन व ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांतील ८१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सात  कर्मचाऱ्यांना सपाटीवर तर ८  कर्मचाऱ्यांची मेळघाटात बदली झाली. सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक ६७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

    जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजतापासून सीईओ अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी, वरिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, परिचर, सफाई कर्मचारी, वाहनचालक यांची बदली प्रक्रिया पार पडली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन अधिकारी व त्यानंतर बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता बांधकाम तसेच स्थापत्य अभियंता सहाय्यक यांच्या प्रशासकीय व विनंती बदली झाली.

    या विभागाच्याही बदल्या

    ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नियंत्रित कनिष्ठ अभियंता पदाची बदली प्रक्रिया झाली. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ६७, बांधकाम विभागातील ३, ग्रामीण पाणी पुरवठा १ व पशुसंवर्धन विभागातील १० अशा ८१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी झाल्या. बुधवारी ११ मे रोजी कृषी, वित्त, महिला व बालकल्याण, शिक्षक व पंचायत विभागाच्या तर १२ मे रोजी ग्रामसेवक, आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांच्या बदल्या होतील. १३ मे रोजी सिंचन व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.