भाविकांसाठी खूशखबर ! चैत्र्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी देवीचे मंदिर 24 राहणारं खुलं

सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

    नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले सप्तश्रृंगी माता मंदिराचा चैत्रोत्सव लवकरच सुरु होणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते. येत्या 16 एप्रिल पासून चैत्रोत्सव सुरु होणार असल्याने मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चैत्रोत्सव काळात भाविकांना 24 तास देवीचे दर्शन घेता येणार आहे.

    सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी माता मंदिराचा भक्तवर्ग मोठा आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये आरध्य दैवत असलेल्या सप्तश्रृंगी मातेचा चैत्रोत्सव 16 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. त्रोत्सव काळात हजारो भाविक सप्तश्रृंगी गडावर गर्दी करत असतात. गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चैत्रोत्सव काळात मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या काळामध्ये मोठी गर्दी होत असेत आणि संपूर्ण राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येत नाही. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाविकांना २४ तासात कधीही देवीचे दर्शन घेता येणार आहे.

    चैत्रोत्सवाची जय्यत तयारी

    त्याचबरोबर चैत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडावरील खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. तसेच महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा टाळण्यासाठी पहिल्या पायरीसमोर मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी ७ ठिकाणी आरोग्य पथके राहणार तैनात ठेवण्यात येणार आहेत.