
सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक तरुणांना आपल्या भवितव्याची काळजी असून स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्या संकल्पनेतून माथाडी नेते व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव मतदार संघातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथाचे वितरण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे .
कोरेगाव : सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक तरुणांना आपल्या भवितव्याची काळजी असून स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्या संकल्पनेतून माथाडी नेते व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव मतदार संघातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथाचे वितरण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे . राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायक व उत्साह वाढवणारा दिवस असतो. या दिवसानिमित्त अल्पोहार, शालेय साहित्य मोफत वाटप, जेवण व भेटवस्तू गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा आपल्या नेत्याला मिळावा नेत्यांना अशी अपेक्षा असते. त्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे , पिंटू गायकवाड, सतिश कांबळे, बंटी गंगावणे व मान्यवरांच्या इच्छा खातिर स्पर्धा परीक्षेची पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना भेट देण्याची अभिनव संकल्पना कार्यान्वित केली जात आहे. यामुळे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सातारा ,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व व इतर स्पर्धेमध्ये उत्तीर्ण व गुणवत्ता मध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. या पुस्तकांचे अवलोकन व अभ्यास करून कोरेगाव मतदार संघातील विद्यार्थी यशस्वी झाले तर त्याचा संपूर्ण फायदा कोरेगाव मतदार संघातील विकास कामांसाठी होणार आहे. याच भावनेतून हा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे.
आतापर्यंत विविध स्पर्धेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांची यादी यशस्वी व अधिकारी म्हणून सध्या शासकीय सेवेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घेऊन सदरची पुस्तके खरेदी करण्यात आलेली आहे. या उपक्रमासाठी सुमारे लाखभर रुपये खर्च केला असून खऱ्या अर्थाने ही लाख मोलाची कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ॲड.जयदेव गायकवाड तसेच आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रमेश उबाळे यांचे मनापासून कौतुक केले आहे.
या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांनी वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्या भागातील इतर गरीब विद्यार्थ्यांना ही पुस्तके देवून त्यांचीही अडचण दूर करावी . जेणेकरून कोरेगाव मतदार संघात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकापासून कुणीही वंचित राहणार नाही. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यात विविध समाजाची लोकसंख्या वाढली आहे.त्यांची जनगणना करून त्यांना त्यांचा हक्वाचा वाटा मिळावा यासाठी सर्वांनी विचार करून निर्णय घेतला पाहिजे असेही आवाहन करण्यात आलेले आहे.