शिवजयंतीनिमित्त दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून दर्जा देणार’, सुधीर मुनगंटीवर यांची माहिती

शिवजयंतीच्या निमित्ताने आग्र्याच्या किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवर यांनी दिली आहे. यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टाची नवी ओळख निर्माण होणार आहे.

    कोल्हापूर:  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम होईल. तर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रात्री आठ वाजता आग्र्यात लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित राहणार आहेत. शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

    शिवजयंतीच्या निमित्ताने आग्र्याच्या किल्ल्याच्या दरबारात दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुनगंटीवर यांनी दिली आहे. यापुढे राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टाची नवी ओळख निर्माण होणार आहे. इतिहासामध्ये दांडपट्टा शस्त्राला विशेष महत्त्व आहे. शिवरायांच्या काळामध्ये अनेक लढाय्यांमध्ये दांडपट्टा शस्त्राने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या शस्त्रला योग्य तो मान दिला जाणार असून यापुढे दांडपट्टा महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून ओळखला जाणार आहे.

    पुढे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने भरदरबारात अपमान केला. त्याच दरबारात येत्या सोमवारी ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या घोषणांचा जयघोष होईल आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.