विभागप्रमुखांनंतर बीडीओ सीईओंच्या रडारवर! मनीषा आव्हाळे यांचे परिपत्रक जारी

झेडपी विभाग प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई ताजी असतानाचं पंचायात समिती बीडीओ सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या रडारवर आले आहेत. ऐन रक्षाबंधन दिनी सीईओ आव्हाळे यांनी पंचायात समिती कर्मचारी झेडपी मुख्यालयात मोकाट फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे.

    सोलापूर : झेडपी विभाग प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई ताजी असतानाचं पंचायात समिती बीडीओ सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या रडारवर आले आहेत. ऐन रक्षाबंधन दिनी सीईओ आव्हाळे यांनी पंचायात समिती कर्मचारी झेडपी मुख्यालयात मोकाट फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. नेमून दिलेले कामकाज सोडून विनाकारण शासकीय वेळेत मुख्यालय परिसरात भटकंती करित असल्याचे आढळून आल्याने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यालयात काम असेल तर बीडीओ अथवा तालूका विविध विभागाचे प्रमुख यांची परवानगी अनिवार्य आहे. कर्मचारऱ्यांना इतरत्र काम मुख्यालयात असेल तर रजा मंजूर करुन घेवून यावे लागेल. रजा मंजूर नसेल तर कर्मचारी सह बीडीओ यांची ही विना वेतन कारवाई करण्यात येणार आहे.

    झेडपी मुख्यालया परिसरात शिक्षकांची सर्वाधीक गर्दी दिसून येते. या पुर्वी ही सीईओ स्तरावरुन विना परवाना मुख्यालयात दिसल्यास कारवाई करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.