गर्भपाताच्या औषधी विकणारे अन्न औषध विभागाच्या रडारवर, केली १९ विक्रेत्यांची तपासणी; चौघांची परवाने निलंबित तर एका विरुद्ध गुन्हा दाखल

गर्भपाताचा कायदा डावलून काहीजण या काळ या धंद्यात उतरल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात आहे. हा गोरखधंदा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. बुलढाणा शहरातील जांभरून रोडवरील एका मेडीकल मध्ये काही महिने आधी गर्भपात करण्याच्या किट सापडल्या होत्या त्यामुळे औषध विभागाने मेडिकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून परवाना निलंबित केला होता.

    बुलढाणा : गर्भधारणा झाल्यावर अनेक जण हॉस्पिटलमध्ये न जाता थेट मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या मागवतात व औषध विक्रेता त्यांना डॉक्टरांची चिट्ठी न बघता गोळ्या देतात असे आढळून आल्याने बुलढाणा अन्न व औषध विभागाकडून कठोर चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये १९ औषध विक्रेत्यांची तपासणी केली व त्यात ५ औषध विक्रेते संशयास्पद वाटल्याने ४ जणांचे औषध विक्रेता परवाने निलंबित केले आहे तर एका मेडिकल दुकानदाराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

    गर्भपाताचा कायदा डावलून काहीजण या काळ या धंद्यात उतरल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात आहे. हा गोरखधंदा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. बुलढाणा शहरातील जांभरून रोडवरील एका मेडीकल मध्ये काही महिने आधी गर्भपात करण्याच्या किट सापडल्या होत्या त्यामुळे औषध विभागाने मेडिकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून परवाना निलंबित केला होता. डॉक्टरांच्या चिठ्ठीत चारशे ते पाचशे रुपयांना मिळणारे औषध तो विक्रेता दोन ते तीन हजार रुपयांना विकत होता यामुळे अन्न व औषध विभागाने वर्षभरात १९ औषध विक्रेते यांची कसून चौकशी करून ५ जण संशयास्पद आढळल्याने त्यातील ४ जणांचे परवाने निलंबित केले आहेत तर एका विरुद्ध बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.