रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाने घोटला सख्ख्या बहिणीचा गळा

चोपडा शहर पोलिसांनी चोपडा वराड रस्त्यावर जाऊन पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यात मुलाची गोळी मारून तर मुलीच्या गळा आवळून खून केल्याची स्पष्ट झाले. ऑनरकिलींगच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

    जळगाव – चोपड्यात अवघ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केला. ही खळबळजनक घटना चोपडा शहरातील चोपडा वराड रस्त्यावर घडली. दोनच दिवसांपूर्वी बहिण-भावाच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबाच्या कथित प्रतिष्ठेपायी ही घटना घडल्यामुळे अवघे समाजमन सुन्न झाले आहे.

    चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक मुलगा पिस्टल घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांना मारून आलो असे पोलिसांना स्वतः सांगितले. यामुळे पोलिसही चक्रावून गेले.

    चोपडा शहर पोलिसांनी चोपडा वराड रस्त्यावर जाऊन पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यात मुलाची गोळी मारून तर मुलीच्या गळा आवळून खून केल्याची स्पष्ट झाले. ऑनरकिलींगच्या घटनेत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमध्ये वर्षा समाधान कोळी( २० रा. सुंदरगढी,चोपडा), राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) अशी या दोघांची नाव आहेत.

    चोपडा येथे प्रेम संबंधातून खून केल्याची घटना समोर आली. या घटनामुळे संपूर्ण चोपडा शहर हादरले आहे. याप्रकरणी मृत मुलीचा अल्पवयीन भाऊ रात्रीच पोलिसांना स्वतः शरण गेला होता. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले करीत आहेत.