One and a half lakh fraud through online trading! Filed a case against Rachika Trading Limited

रचिका ट्रेडिंग लिमिटेड (Rachika Trading Limited) च्या प्रतिनिधीने लॉगिन करण्यास सांगितले. तसेच, त्यावरून १४० रुपयाचे रिचार्ज (Recharge) व ई-कॉमर्स साईटवरून (E-commerce site) २०० रुपयाचे घडयाळ खरेदी करण्यास सांगून त्या मोबदल्यात ३०० रुपये फिर्यादीच्या खात्यात जमा केले. त्यामुळे फिर्यादीचा सदर वेबसाईटवर (website) विश्वास बसला.

    यवतमाळ :  ऑनलाइन ट्रेडिंग च्या  (Online trading) माध्यमातून एका तरुणाची एक लाख ५७ हजार १४० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही घटना उमरखेड (Umarkhed) तालुक्यातील बोरगाव येथे २२ जूनला उघडकीस आली.

    सचिन रामपुरी गोस्वामी (Sachin Rampuri Goswami) (रा. बोरगाव तालुका उमरखेड) असे फिर्यादीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार फिर्यादीस WWW.UKD189.IN या वेबसाईटवर (website) लॉगीन रचिका ट्रेडिंग लिमिटेड (Rachika Trading Limited) च्या प्रतिनिधीने लॉगिन करण्यास सांगितले. तसेच, त्यावरून १४० रुपयाचे रिचार्ज (Recharge) व ई-कॉमर्स साईटवरून (E-commerce site) २०० रुपयाचे घडयाळ खरेदी करण्यास सांगून त्या मोबदल्यात ३०० रुपये फिर्यादीच्या खात्यात जमा केले. त्यामुळे फिर्यादीचा सदर वेबसाईटवर (website) विश्वास बसला.

    त्यानंतर फिर्यादी यांनी १ लाख ५७ हजार १४० रुपये गुंतवणूक केली. तसेच, त्या मोबदल्यात रक्कम जमा करण्याची विनंती केली. मात्र, संबधित  आरोपीने जवळपास १ लाख रुपये रिचार्ज केल्याशिवाय २ लाख ६५ हजार रुपये काढता येणार नाही असे सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी उमरखेड पोलीस ठाणे( Umarkhed Police Thane )गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रचिका  ट्रेडिंग लिमिटेडवर (Rachika Trading Limited) गुन्हा दाखल केला.