गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; तब्बल २० किलो गांजा जप्त

गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यातआला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास चाकण येथे करण्यात आली.

    पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यातआला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ९) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास चाकण येथे करण्यात आली.

    आशिष शिवपूजन पांडे (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साईसिंग (रा. शहादा, जि. नंदुरबार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून आशिष याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २० किलो २२१ ग्राम गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ४१ हजार ६००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.