One died on the way and 8 others were seriously injured in a tragic accident

एमएच ३२ एएच ०९७५ या क्रुझर चारचाकी वाहनाचा चालक हा मद्य प्राशन करून गाडी चालवत होता. दरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीराम मानकर ५२ या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर कमला मानकर ६५ या महिलेला नागपूरला रेफर केले, असता रुग्णवाहिकेत वाटेतच तिचा मृत्यू झाला.

    चंद्रपूर : लग्न आटोपून वरात भिसी वरून आंबोली येथे जात असतांना पुयारदंड गावाजवळ क्रुझर ट्रॅक्स वाहनाचा भीषण अपघात घडला. या अपघातात १ जण जागीच ठार झाला तर, एका महिलेचा वाटेत मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

    प्राप्त माहितीनुसार, एमएच ३२ एएच ०९७५ या क्रुझर चारचाकी वाहनाचा चालक हा मद्य प्राशन करून गाडी चालवत होता. दरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये श्रीराम मानकर ५२ या इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर कमला मानकर ६५ या महिलेला नागपूरला रेफर केले, असता रुग्णवाहिकेत वाटेतच तिचा मृत्यू झाला. यात ३ महिला, ४ पुरुष व एक ५ वर्षाची छोटी मुलगी असे एकूण ८ जण गंभीर जखमी असून भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले.

    शेगाव जवळील दादापूर येथील मुलगी सोनू नन्नावरे हिचा आंबोली येथील कवडू मानकर या मुलाशी भिसी येथील पत्रुजी दडमल (मुलीचे भाउजी) यांच्या घरून लग्नाचा कार्यक्रम आटोपून वरात भिसीकडून आंबोलीला जात असतांना पुयारदंड गावाजवळ हा भीषण अपघात घडला. श्रीराम मानकर (नवरदेवाचा काका ) यांच्या मृत्यू पश्चात पत्नी व दोन मुले, तर कमलाबाई (नवरदेवाची आजी) हिच्या मृत्यू पश्चात पती व मुलगा असा आप्त परिवार आहे.

    मानकर परिवारात लग्नाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक श्रीराम मानकर यांचे शव उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले असून पुढील कारवाई भिसी पो. स्टेशनचे पोलीस ठाणेदार प्रकाश राऊत यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.