समृद्धीवर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; गौरी-गणपतीसाठी अमरावतीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

  वाशिम : समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway Accident) वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून तिथे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असल्याचा दावा करत असलं तरीह इथे होणारे अपघात काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता पुण्यावरुन अमरावतीला (Amaravti Accident News) जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. गौरी गणपतीनिमित्त एक कुटुंब पुण्याहून अमरावतीच्या दिशेनं निघालं होत. मात्र, वाटेत वन्यप्राण्याला धडकून कारचा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

  कसा झाला अपघात?

  मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी गणेश चर्तुर्थीचं निमित्ताने पुण्यातील दुरुतकर कुटुंबीय कारने अमरावतीच्या दिशेने निघाले. समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाल्याची महिती समोर आली आहे. कार महामार्गावरुन जाताना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन लोकं गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी बचाव कार्य करत प्रवेशांना बाहेर काढलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

  वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल
  या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.

  दोन महिन्यापुर्वी झाला भीषण अपघात

  बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला होता. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात (Samruddhi Highway Accident) झाला . या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. या भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या (Vidarbha Travels) बस चालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.