Rushing dumper crushed the woman! Gangadham Road incident; Traffic despite the ban on heavy vehicles

एक अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याच मार्गावरून भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील उमरेड बायपास मार्गानजीक घडल्याची नुकतीच उघडकीस आली.

    बुटीबोरी : एक अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याच मार्गावरून भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील उमरेड बायपास मार्गानजीक घडल्याची नुकतीच उघडकीस आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील अनोळखी इसम हा उमरेड बायपास नजीकच्या चंद्रपूर-नागपूर मार्गावरून रस्ता ओलांडत असताना त्याच मार्गाने जात असलेल्या ट्रॅव्हल्स (क्र.एम एच 34 ए बी 0009) च्या चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून सदरच्या इसमास जोरदार धडक दिली.

    यामध्ये इसमाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक कुमूदिनी पाथोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

    अनोळखी इसम हा अंदाजे 50 ते 55 वर्ष वयोगटातील असून, उंची साधारण 5 फूट 6 इंच, रंग सावळा, दाढी मिशी वाढलेली, डोक्यावरील काळे पांढरे केस, लांबट चेहरा, बारीक डोळे, अंगात निळसर तसेच त्यावर पिवळ्या रंगाने इंग्रजीमध्ये वीएफ असे लिहिलेले फुल बाह्यांचे शर्ट आणि राखडी रंगाचा फुल पॅन्ट असे वर्णन आहे.