
उमदी गावातील समता आश्रम शाळा (Samata Ashram Shala) येथील मुलांना देण्यात आले होते. यानंतर सायंकाळी मुलांना ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाल्या. समता आश्रम शाळेतील १७० हून अधिक मुलांना विषबाधा झाली आहे.
सांगली – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सांगलीतील एका आश्रमशाळेत एक दोन नाहीतर, तब्बल १७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची दर्देवी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमदी येथील आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून, २० विद्यार्थ्यांना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. (one hundred seventy students poisoned by food in umdi ashram school in sangli treatment started for students)
नेमकं काय झालं?
दरम्यान, जत (Jat) तालुक्यातील उमदी गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळा (Samata Ashram Shala) येथील मुलांना देण्यात आले होते. यानंतर सायंकाळी मुलांना ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाल्या. समता आश्रम शाळेतील १७० हून अधिक मुलांना विषबाधा झाली आहे. सध्या ही सर्व मुलं माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढील तपास सुरु आहे.