One killed, 18 injured in three-storey house collapse in Bandra

वांद्रे येथील शास्त्री नगर मध्ये बुधवारी मध्यरात्री तीन मजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले. यामध्ये १८ जखमींवर नजीकच्या भाभा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे(One killed, 18 injured in three-storey house collapse in Bandra).

    मुंबई : वांद्रे येथील शास्त्री नगर मध्ये बुधवारी मध्यरात्री तीन मजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जण जखमी झाले. यामध्ये १८ जखमींवर नजीकच्या भाभा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे(One killed, 18 injured in three-storey house collapse in Bandra).

    गंभीर जखमी शाहनवाज आलम (५५) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांद्रे महाराष्ट्र नगर प्लॉट ३, शास्त्री नगर मधील झोपडपट्टीत बुधवारी मध्यरात्री रात्री १२.२० वाजताच्या सुमारास परिसरात सर्वजण झोपलेले असताना तीन मजली लोखंडी पत्र्याचे घर अचानक कोसळले.

    पत्र्याचे घर असल्याने आवाज प्रचंड झाला आसपासच्या परिसरातील नागरिक दुर्घटना घडलेल्या ठिकाणी पोहचले. ठिगाऱ्यातून येणाऱ्या आवाजामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या लोकांनी बचावकार्य सुरू केले. तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी युद्धपातळीवर झालेल्या बचावकार्यामुळे 19 जणांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले.

    या १९ जखमींपैकी अनेकांच्या डोक्याला, हाताला, पायाला, तोंडाला, कमरेत मार लागला व तर काहींना जखमा झाल्या. या जखमींपैकी एक शाहनवाज (55) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर भाभा व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

    या १८ जखमींमध्ये २ अल्पवयीन मुले, ६० वर्षांवरील ३ व्यक्ती व तरुण मुले यांचा समावेश आहे. मात्र या १८ जखमींपैकी एकजण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे. घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या घराचा ढिगारा उचलण्याचे काम सुरू होते.  दरम्यान, ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.