नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर टेम्पो झाला पलटी; एकजण जागीच ठार तर ८ गंभीर

नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील साईनाथनगर ते नेवासा बुद्रुक येथील मधल्या रस्त्यावर साईनाथनगर शिवारात केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो पलटी होऊन अपघात (Accident in Newasa) झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

    नेवासा : नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील साईनाथनगर ते नेवासा बुद्रुक येथील मधल्या रस्त्यावर साईनाथनगर शिवारात केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो पलटी होऊन अपघात (Accident in Newasa) झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

    या अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे व पोलिस नाईक बबन टमनर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यासाठी मदतकार्य सुरु केले. जखमींवर नेवासा फाटा येथील साईसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण जखमी झालेले असून, जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली.

    याबाबत अधिक सविस्तर माहीती अशी की, खुलताबाद (जि.औरंगाबाद) येथील केळी व्यापाऱ्यांचा टेम्पो केळी आणण्यासाठी नेवाशाकडे येत असताना साईनाथनगरहून नेवासा बुद्रुककडे येत असताना हा टेम्पो रस्त्यावर अचानक पलटी झाला. या टेम्पोने दोन पलट्या घेतल्यामुळे हा अपघात झाला.

    या अपघातात खलिल छोटू बेग (वय ५६ रा.खुलताबाद जि.औरंगाबाद) जागीच ठार झाला. तर मिर्झा युन्नस शेख (वय ४२), मिर्झा बब्बू शेख (वय ३५), इम्रान शेख (वय २८), सोहेल सलिम शेख (वय २१), मुक्तार अहेमद शेख (वय ३५), मिर्झा फैंग बेग (वय २४), इब्राहिम शेखचंद शेख (वय ३५), मिर्झा फरुद्दीन बेग (वय २२, सर्व रा. खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथील आहेत. अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.