खेड येथे कार उलटून एक ठार, पाच जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्घटना

वाहनचालक संजय गणपत नामे (वय ४३, रा. मालाड, शांतारामपाडा मुंबई) हे शुक्रवारी (दि. १३) पहाटे मुंबईहून लांजाकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर मोटार भरधाव वेगाने चालवित असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कच्च्या साईडपट्टीवरील दगडाला आपटून उलटली.

    खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खेड (Khed) तालुक्यातील उधळे गावानजीक (Udhale Gaon) शुक्रवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कार उलटून झालेल्या अपघातात (Car Accident) एका वृद्धाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून, पाच प्रवासी जखमी झाले. मुंबईहून लांजाकडे जाणाऱ्या (Mumbai To Lanja) कार वरील चालकाचे नियंत्रण सुटून, कार रस्त्याच्या बाजूला उलटली.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालक संजय गणपत नामे (वय ४३, रा. मालाड, शांतारामपाडा मुंबई) हे शुक्रवारी (दि. १३) पहाटे मुंबईहून लांजाकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर मोटार भरधाव वेगाने चालवित असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कच्च्या साईडपट्टीवरील दगडाला आपटून उलटली. अपघातात मोटारीतील गणपत नारायण नामे (वय ७५, रा. मालाड) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले

    अपघाताची माहिती मिळताच, कशेडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी समील सुर्वे घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कळंबनी येथे उपचारासाठी दाखल केले. कार मधील इतर प्रवासी संजय गणपत नामे (वय ४३), (संतोष गणपत नामे ४५), अंजना संतोष नामे (३८), संचित संतोष नामे (८), श्रीवल्ली संदीप नामे (८) हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.