knife attack in dombivali

डोंबिवली पूर्वेकडील (Dombivali East) सागरली परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील याने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरू केला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागरली परिसरातून जात होता. याच दरम्यान पवन पाटील याने त्याला गाठले. वर्णनावरून त्याला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने विठ्ठल याला बेदम मारहाण केली.

    कल्याण ग्रामीण: रागाच्या भरात कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. बहिणीला छेडल्याने संतापलेल्या एका भावाने भलत्याच तरुणाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर भावाने चाकूने तरुणाच्या(Knife Attack In Dombivali) हातावर हल्लादेखील केल्याची घटना काल रात्रीचा सुमारास डोंबिवली (Dombivali) सागरली परिसरात घडली. हा तरुण आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचे माहित पडताच या तरुणांनी तिथून पळ काढला. विठ्ठल भालेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर पवन पाटील असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे याप्रकरणी टिळक नगर पोलीस (Tilak Nagar Police) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    डोंबिवली पूर्वेकडील सागरली परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील याने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरू केला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागरली परिसरातून जात होता. याच दरम्यान पवन पाटील याने त्याला गाठले. वर्णनावरून त्याला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने विठ्ठल याला बेदम मारहाण केली. विठ्ठल पवनला का मारहाण करतोयस याबाबत विचारत होता मात्र पवनने काही न ऐकता विठ्ठलला मारहाण सुरूच ठेवली. इतकेच नव्हे संतापाच्या भरात पवन पाटीलने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हल्ला केला. या हल्ल्यात विठ्ठलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. विठ्ठलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

    घटनेची माहिती मिळताच टिळक नगरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार टिके यांनी विठ्ठलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे