अंजाळेच्या एकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या; स्थानिकांना माहिती मिळताच…

तालुक्यातील अंजाळे येथील रहिवासी असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना भुसावळजवळील तापी नदीत घडली.

    यावल : तालुक्यातील अंजाळे येथील रहिवासी असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना भुसावळजवळील तापी नदीत घडली. हा प्रकार निदर्शनास येताच या व्यक्तीला नदीतून बाहेर काढत यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

    प्रमोद प्रकाश सपकाळे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रमोद हे अंजाळे येथून भुसावळला गेले होते व शहराबाहेरील तापी नदीवरील पुलावरून थेट त्यांनी नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निर्दशनास येताच सपकाळे यांना नदीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत सपकाळे यांना मृत घोषित केले.

    दरम्यान, याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.