कंटेनरची धडक बसल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू  तर अन्य तीन जण जखमी

कंटेनरची धडक बसल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना चिखली येथे घडली.

    पिंपरी :  कंटेनरची धडक बसल्याने एका वारकऱ्याचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना चिखली येथे घडली.
    याबाबत सविस्तर माहीती अशी,  बुलढाणा जिल्ह्यातील देऊळराजा येथील चार वारकरी पायी चालले होते. त्याचवेळी एका कंटेनरने (क्र. एम.एच.12 क्यू जी 5368) चार वारकऱ्यांना मागून धडक दिली. या अपघातात भगवान घुगे (रा. देऊळगावराजा जि. बुलढाणा) या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर बबन जायभाई पुंजाबाई, साहेबराव हुसे, भिकाजी बनसोडे हे तिघे जखमी झाले.याबाबत भास्कर जायभावे (वय 41,रा. दगडवाडी ता. देऊळराजा,जि. बुलढाणा) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे या वारकऱ्यांबरोबर पायी चालले होते. या अपघात प्रकरणी जगन्नाथ मुंडे (वय 42 रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.