एटीएसच्या कारवाईत कोल्हापुरातील एकजण ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि दहशतवादी विरोधी पथक (ATS) यांनी एकत्रितपणे आज देशभरातील विविध राज्यांमध्ये छापीमारी करून जवळपास १०० जणांना ताब्यात घेतला आहे.

    कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि दहशतवादी विरोधी पथक (ATS) यांनी एकत्रितपणे आज देशभरातील विविध राज्यांमध्ये छापीमारी करून जवळपास १०० जणांना ताब्यात घेतला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) सदस्यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्रातील २० जणांचा यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये कोल्हापुरातील सुद्धा एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
    देशभरातील एकूण दहा राज्यांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरातील जवाहरनगर येथील अब्दुल मौला मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले आहे. याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मौला याच्या घरासमोर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. सध्या अब्दुल मौला याच्या फ्लॅटला मात्र सकाळपासून कुलूप लावल्याने बंद आहे. पहाटेच कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.