palghar accident

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmadabad National Highway) एक टेम्पो (Palghar Accident) डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    पालघर : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmadabad National Highway) रविवारी झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना होऊन ४८ तास उलटण्याच्या आतच आता आणखी एका अपघाताची (Accident News) माहिती समोर आली आहे.  सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताप्रमाणेच हाही अपघात झाला आहे. एक टेम्पो (Palghar Accident) डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

    पालघर जिल्ह्यातील धानिवरी नदी पुलाजवळ टेम्पोचा अपघात झाला. टेम्पो एक खड्ड्यामध्ये आदळल्यानंतर त्याचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. यानंतर टेम्पो सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताप्रमाणेच पुलावरील डिव्हायरला धडकला. या टेम्पोमध्ये ड्रायव्हरस अन्य दोघेजण होते. त्यातील एकाला गंभीर जखम झाली आहे. या जखमीवर कासा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. तर अन्य दोघांना किरकोळ मार बसलाय. सुदैवानं तिघेही जण या भीषण अपघातामधून अगदी बालंबाल बचावले आहेत. मात्र टेम्पोचं खूप नुकसान झालं आहे.