किरकोळ कारणावरून झाला वाद नंतर कुऱ्हाडीने घाव घालत तरुणाचा खून

वडनेर खुर्द (ता.शिरुर) येथील एका फार्म हाऊसमध्ये किरकोळ वादातून एका युवकाने आत्ताउल्ला शाबीर खान या युवकाचा कुऱ्हाडीने (One Youth Murder) वार करुन खून केल्याची घटना घडली.

    शिक्रापूर : वडनेर खुर्द (ता.शिरुर) येथील एका फार्म हाऊसमध्ये किरकोळ वादातून एका युवकाने आत्ताउल्ला शाबीर खान या युवकाचा कुऱ्हाडीने (One Youth Muder) वार करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे शहीद रफिक बागवान याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली.

    वडनेर खुर्द (ता. शिरुर) येथील जाकीर सय्यद यांच्या फार्म हाउसमध्ये शहीद बागवान व आत्ताउल्ला उर्फ मोईन खान हे दोघे असताना त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. शहीद याने कुऱ्हाड घेऊन आत्ताउल्लाच्या डोक्यात, मानेवर, कपाळावर वार करत त्याचा खून केला.

    या घटनेत आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय २२, रा. चेंबूर, मुंबई) याचा मृत्यू झाला असून, याबाबत देविदास विष्णू मोकाशी (वय २१ रा. वडनेर खुर्द ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिरुर पोलिसांनी शाहीद रफिक बागवान (रा. जाम मोहल्ला भुसावळ रेल्वे स्टेशन ता. भुसावळ जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.